Breaking News

भारत विकास परिषदेच्या वतीने मास्क

पनवेल : रामप्रहर वृत्त – भारत विकास परिषद, पनवेल शाखेच्या वतीने  पंचशील नगर वस्ती मध्ये मास्क वाटप करण्यात आले. संस्थेच्या सदस्यांनी देणगीच्या रुपात कापडी व धुवून पुन्हा पुन्हा वापरता येतील असे एक हजार मास्क जमा केले व घरोघरी जाऊन दिले, ज्यायोगें गर्दी टाळता आली. मास्क वाटप करताना सर्व सदस्यांनी मास्क घातला होता व परस्पर स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेतली घेतली.

या अभियानात खांदेश्वर पोलीस ठाण्यातून दोन पोलीस देखरेख करण्यासाठी आलेले होते. त्यामुळे कुठेही गर्दी किंवा गोंधळ न होता वाटप व्यवस्थित पार पडले. मास्क देताना या सर्व नागरिकाना सोशल डिस्टन्सिंगचे महत्व पटवून देवून त्याचे पालन करण्याचे आवाहन केले गेले.  या अभियानात पनवेल शाखेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, डॉ. कीर्ती समुद्र, राजन ओक, मिलिंद गांगल, प्रसन्न समुद्र, नरेंद्र कुलकर्णी व ज्योती कानिटकर ह्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.

या अभियानाबाबत माहिती देताना भारत विकास परिषदच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष गिरीश समुद्र यांनी सांगितले, सध्या आवश्यक असलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन काही परिसरात होत नाही. तसेच काही गरीब समाजापर्यंत मास्क पोहोचलेले नाहीत यासाठी परिषदेच्या वतीने हे अभियान राबविले जात आहे. अजूनही काही दिवस आमची संस्था पनवेल परिसरातील मागास वस्त्या व पाड्यांमधे हे अभियान राबविणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply