Tuesday , February 7 2023

दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी बनण्याचे प्रयत्न करावेत, नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांचे प्रतिपादन

उरण ः वार्ताहर

उरण नगरपालिका हददीतील दिव्यांग व्यक्तींनी परावलंबी न राहता स्वावलंबी बनण्याचे प्रयत्न करावे, असे प्रतिपादन उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केले. दिव्यांग व्यक्तींच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. तसेच दिव्यांग व्यक्तींना उदार्निवाहासाठी वर्षाला सहा हजार रुपये मदत रूपाने करीत आहे. व्यवसायासाठी कमी व्याजाच्या दराने कर्ज देत आहे. व या पुढेही उरण नगरपरिषद सहकार्य, मदत करीत राहील असे त्यांनी म्हटले.

या पुढे त्या म्हणाल्या की, महिलांनी बचत गट बनवा त्या साठीही नगरपालिका नेहमीच मदत करेल तुम्हाला प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करीत असतो, शासकीय योजनांचा फायदा घ्या. आम्ही तुम्हाला नेहमीच मदत करू असेही

त्या म्हणाल्या. या वेळी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मुख्याधिकारी अवदूत तावडे, नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक मेराज शेख, शिक्षण सभापती रवी भोईर, नगरसेविका यास्मिन गॅस, संपूर्णा थळी, अपंग कल्याण योजना विभाग प्रमुख नरेंद्र उभारे, सहाय्यक संजय पवार, दिव्यांग व्यक्तींचे नातेवाईक आदी उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply