Breaking News

पनवेलमध्ये महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते

कोरोना लशीच्या मोहिमेचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना विषाणूपासून रक्षण करणार्‍या कोविशील्ड या सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. बहुप्रतीक्षित या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते झाला. पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील एमजीएम हॉस्पीटलमध्ये राबविण्यात येणार्‍या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते झाला.

कोरोना विषाणूला रोखणार्‍या कोविशील्ड या वॅक्सीनची लसीकरण मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी कोविड 19 लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत ऑनलाइन मार्गदर्शन करत नागरिकांशी आणि कोविड योद्ध्यांशी संवाद साधला. त्यानुसार पनवेल महापालिका क्षेत्रातील एमजीएम हॉस्पिटल आणि येरळा मेडिकल हॉस्पिटलमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून, कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ झाला.

या वेळी प्रांतअधिकारी दत्तात्रेय नवले, अतिरिक्त आयुक्त सांडभोर मॅडम, उपायुक्त विठ्ठल डाके, आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी, शहर अभियंता जगताप, मनोजकुमार शेट्टे, धैर्यशील जाधव यांच्यासह अधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या कोरोना लसीच्या वापराला सुरुवात झाल्याने कोरोनाच्या सावटातून नागरीकांची सुटका होणार आहे. पनवेलमध्ये जवळपास दोन हजार लस दाखल झाल्या असून या लस, कामोठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्टोरेज करण्यात आल्या आहेत. तसेच सर्वप्रथम कोरोना योद्ध्यांना या लशीचा लाभ मिळणार असून, पहिला डोस 200 आरोग्य कर्मचार्‍यांना दिला जाणार आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply