Breaking News

पत्रकार संघर्ष समितीकडून भल्याची वाडी येथे वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर – पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील भल्याची वाडी येथे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निराधार कुटुंबांना करण्यात आले.

सामाजिक सुरक्षितता पाळा गर्दी टाळा स्वच्छता राखा मास्क वापरा हात सातत्याने साबणाने धुवा, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सामाजिक संदेश देत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने सुमारे 35 हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार पसरू नये याकरिता संपूर्ण शहरात तालुक्यात राज्यात देशात लॉकडाऊन केले आहे यामुळे अनेक कंत्राटी कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर, हातावर पोट असलेले कामगार, यांचा उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. ज्यांना ज्यांना शासनाची कोणतीही मदत पोहोचली नाही, ज्यांना कुठूनही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा झाला नाही अशा कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भल्याची वाडी येथे करण्यात आले.

हा कार्यक्रम करीत असताना सामाजिक अंतर ठेवून वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू देऊन किमान काही दिवस त्यांचे पोट भरेल असे धान्य देऊ केले आहे.  या कार्यक्रमास पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस मंदार दोंदे, कार्याध्यक्ष संजय कदम, खजिनदार केवल महाडिक, समितीचे सल्लागार दीपक महाडिक, समितीचे ज्येष्ठ सभासद विवेक पाटील, अ‍ॅड. मनोहर सचदेव, सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील आदी सभासद व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी कोंडले ग्रामस्थ गणेश पाटील यांच्यासह ग्रामीण भागातील सहकारी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply