Monday , June 5 2023
Breaking News

जेएनपीटी टाऊनशीपसमोर तातडीने गतिरोधक बसवा

सुधीर घरत यांची मागणी

जेएनपीटी : वार्ताहर

वाहनांची आणि माणसांची वर्दळ असलेल्या जेएनपीटी टाऊनशिप गेटसमोरील रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावी, अशी मागणी भाजप वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर घरत यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. आठ दिवसाच्या आत येथे गतिरोधक बसविले नाहीत तर रास्तारोको करण्याचा इशाराही सुधीर घरत यांनी दिला आहे.

जेएनपीटी टाऊनशिप गेट हे अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे. या ठिकाणाहून दिवसाला चार ते पाच हजार प्रवासी, नोकरदार प्रवास करीत असतात. त्याशिवाय जेएनपीटी टाऊनशिप येथील शाळांमध्ये पाच हजार विद्यार्थी ये-जा करीत असतात. या रस्त्याचे तीन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यावेळेस येथे असणारे गतिरोधक काढण्यात आले होते. रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर मात्र पुन्हा येथे गतिरोधक बनविले नाहीत. त्यामुळे या तीन महिन्यात या ठिकाणी अनेक लहान लहान अपघात झाले आहेत. भरधाव वेगाने धावणार्‍या वाहनांमुळे लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कोणा नागरिकाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल विचारला आहे.

या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बांगर यांच्याकडे विचारणा केली असता सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यंत्रणा आणि लागणारे साहित्य नाही त्यामुळे परत कधी येथे डांबरीकरणाचे काम निघेल तेव्हा आम्ही येथे स्पीड ब्रेकर बनवू, असे बेजबाबदार

उत्तर दिले.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply