Breaking News

उरणमध्ये कोरोनाविरुद्धचा लढा आता होणार अधिक तीव्र; व्यापारी असोसिएशनचा पुढाकार; दुकानदार, विक्रेत्यांसाठी वेळापत्रक

उरण : वार्ताहर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण शहरात विविध उपाययोजना करण्याचे आवाहन व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. दुकानदार, विक्रेते तसेच नागरिकांनी मिळून कोरोनाविरुद्ध लढा तीव्र लढा देण्याचे या माध्यमातून निर्धार करण्यात आलेला आहे.

येत्या 20 एप्रिलपासून सर्व हॉटेल आणि मिठाई विक्रेते यांनी रोज सकाळी 8 ते दुपारी 2 व सायंकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत फक्त पार्सल देण्याकरिता आपली दुकाने सुरू ठेवावी. टेबल-खुर्चीचा वापर करू नये. दूध विक्रेत्यांनी त्यांची दुकाने रोज सकाळी 6 ते दुपारी 12पर्यंत सुरू ठेवावी.  किराणा विक्रेते, ड्रायफ्रूट विक्रेते, गोळ्या-बिस्कीट होलसेल विक्रेत्यांनी तंबाखूयुक्त कोणत्याही वस्तू विकू नयेत तसेच यांनी आपली दुकाने रोज सकाळी 8 ते दुपारी 1पर्यंत सुरू ठेवावी. भाजी व फळ विक्रेत्यांनी रोज सकाळी 7 ते दुपारी 12पर्यंत सेंट मेरी शाळेचे मैदान व एनआय हायस्कूलचे मैदान येथे विक्री करावी. मासे विक्रेत्यांनी वीर सावरकर मैदानावर (लाल मैदान) सकाळी 7 ते दुपारी 12पर्यंत विक्री करावी. हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आपली हातगाडी

सुरू करू नये.

दुकानदार बंधूंनी आणि उरणातील सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन उरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, उपाध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, सेक्रेटरी हस्तीमल मेहता, सदस्य हितेश शाह, अजित भिंडे यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply