Breaking News

नागोठण्यातही 33 जण ताब्यात

नागोठणे : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागोठण्यातही मॉर्निंग वॉक करणार्‍या 33 जणांना रविवारी (दि. 19) नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले. यात काही महिलांचाही समावेश होता. कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन व संचारबंदीकडे दुर्लक्ष करीत नागोठण्यातील काही नागरिक बिनक्कित फिरत आहेत. अशाच प्रकारे रविवारी नागोठणे-वासगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉक करीत असताना 33 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भऊड, हेड कॉन्स्टेबल पाशीलकर, पोलीस नाईक मातेरे, पिंगळे यांनी यांच्या पथकाने ही धरपकड केली. या सर्वांना पोलीस ठाण्यात आणल्यावर त्यांना दोन तास बसवून ठेवण्यात येऊन नंतर सोडून देण्यात आले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply