ठाणे : प्रतिनिधी – लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ‘इंडिया एसएमई 100’ पुरस्कार पितांबरी प्रॉडक्ट्स प्रयव्हेट लि. कंपनीला मिळाला. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येतो.
जागतिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पितांबरीचे उपाध्यक्ष आणि मार्केटिंग डायरेक्टर परीक्षित प्रभुदेसाई यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जगभरातील 44 देशांचे 175 प्रतिनिधी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या पुरस्कारासाठी देशभरातून सुमारे 34 हजार कंपन्यांनी माहिती पाठविली होती. त्यामधून केवळ 100 कंपन्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पितांबरीसह महाराष्ट्रातील 23 कंपन्यांचा समावेश आहे.