Breaking News

रायगड जिल्ह्यातील 16 धरणे पूर्ण भरली

अलिबाग : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे रायगड जिल्ह्यात धरणामध्ये पाणीसाठी वाढू लागला आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पांपैकी 16 धरणे पूर्ण भरली आहेत.
जून महिन्यात अनियमित पाऊस झाला असला तरी जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. 12 जुलैपर्यंत 918 मिलीमिटर पावसांची नोंद झाली आहे. जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत पहिल्या 12 दिवसांतच 79 टक्के पाऊस पडला आहे. जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत 28 धरणे आहेत. यातील 16 धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. ढाकशेत, कुडकी, खिंडवाडी, खैरे, बामणोली हे लुघपाटबंधारे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. यात 88 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply