पनवेल : रामप्रहर वृत्त
गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल 60 हजार कुटुंबांना गणेशोत्सव गोड करण्यासाठी अन्नधान्य दिले जात आहे. या अंतर्गत पनवेल कोळीवाड्यात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात लॉकडाऊन लागू झाल्यापासून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने नागरिकांची विविध प्रकारे सेवा करून सर्वतोपरी मदत सुरू झाली. मदतीचा हा ओघ आजतागायत सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवात ग्रामीण व शहरातील 60 हजार कुटुंबांना साखर, मैदा, तूप, गूळ, चणाडाळ व रवा या धान्याचे एकत्रित पॅकेट्स देऊन गणेशोत्सव गोड केला जात आहे. त्यानुसार पनवेल शहरातील कोळीवाड्यात दत्ता पाटील व हरू भगत यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी कोळी समाज पंच कमिटी व कार्यकर्ते उपस्थित होते.