Sunday , September 24 2023

खोपोलीत बालिकेची हत्या करणारा आरोपी गजाआड

खोपोली : प्रतिनिधी

येथील रहिवाशी भागातील चार वर्षांच्या बालिकेची क्रूरपणे हत्या करणार्‍या आरोपीस पोलिसांनी वेगाने तपासाची यंत्रणा राबवून गजाआड केले आहे. याप्रकरणी शेजारीच राहणार्‍या 27 वर्षीय तरुणास अटक केली आहे. आरोपीला बालिकेच्या आईशी अनैतिक संबंध प्रस्थापित करावयाचे होते व त्याने यापूर्वी तसे प्रयत्नही केले होते, मात्र मुलीच्या आईने त्यास कडाडून विरोध केला होता. या रागातून विकृताने सूड घेण्यासाठी तिच्या मुलीला निर्दयीपणे ठार मारल्याचे समोर आले आहे. घटना घडल्यानंतर खोपोली पोलिसांनी शेजारी राहणार्‍या 27 वर्षीय युवकास संशयावरून ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान त्याने वेगवेगळ्या हकीकती सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाकी दाखवल्यानंतर अखेर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply