Breaking News

पनवेल मनपा सत्ताधार्यांच्या मध्यस्थीमुळे दिव्यांगांना निधीचे वाटप होणार

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेकडून दिव्यांगांना निधी वाटप करण्यास उशीर होत असल्याने दिव्यांगांनी आंदोलन पुकारले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधारी पक्षाने अधिकार्‍यांशी चर्चा केल्यावर प्रशासनाने लेखी पत्र देत दिव्यांगांना 50 टक्के रक्कम वाटप करण्यात येईल, असे सांगितले.

पनवेल महापालिका हद्दीत जवळपास एक हजारहून अधिक दिव्यांग नागरिक आहेत. त्यांना 2017-18मध्ये सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांंनी महासभेवर अपंग आणि दलित निधी वाटपासाठी मोर्चा आणल्यावर अपंगांच्या खात्यात 75 टक्के रक्कम आणि 25% रक्कम इटीसीसे नंतर साथी राखीव ठेवण्यात आली होती. प्रशासानाने 2018-19च्या निधीचे वाटप करताना नवीन धोरण अवलंबून वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गेल्या वर्षी वाटप केलेल्यांना निधी दिला जाणार नाही, असे आडमुठे धोरण घेतले. त्याला दिव्यांगांनी विरोध केला. दिव्यांगांना 50 टक्के रकमेचे वाटप करणे, तसेच सरसकट लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता वाटप करून जुने व नवे असा भेदभाव न करण्याच्या मागण्या दिव्यांगांनी केल्या होत्या. शासन निर्णयानुसार महापालिका अंतर्गत येणार्‍या दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यामध्ये अपंग निधी वर्ग करण्याची मागणी मात्र पालिकेच्या वतीने मान्य करण्यात येत नव्हत्या.

यामुळे दिव्यांगांच्या वतीने बुधवार (दि. 13)पासून पालिकेच्या कार्यालयावर आंदोलन सुरू करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अनिल भगत आणि नितिन पाटील यांनी चर्चा करून   प्रशासनाला 14 फेब्रुवारी रोजी दिव्यांगांच्या मागण्या मान्य करायला लावल्या व दिव्यांगांना 50 टक्के रक्कम वाटपाचा निर्णय घ्यावा लागला. उर्वरित रक्कम वस्तूंचे वाटप करण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिव्यांग संघटनांनी आनंद व्यक्त करून आमदार प्रशांत ठाकूर यांना धन्यवाद दिले आहेत.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply