शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे सातत्याने होत आहेत. त्या अंतर्गत सुकापूर येथील शिलोत्तर रायचूर या परिसरात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 13) झाले.
पनवेल सुकापूर शिलोत्तर रायचूर येथील विठ्ठल मंदिर ते आनंदनगर या मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामाच्या शुभारंभाच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते चाहूशेठ पोपेटा, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे, आलूराम केणी, अशोक पाटील, मंगलबुवा पाटील, आत्माराम पाटील, बाळकृष्ण पाटील, प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, राजेश पाटील, महेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अरुणशेठ भगत आणि अमित जाधव यांनी या कामासंदर्भात अधिक माहिती दिली.