नवी दिल्ली : अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या तुलनेत भारताने कोरोनच्या लढाईत विजय मिळवला आहे. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरू झाले आहेत. बंदरे सुरू झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आपण बरेच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ, असे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. कोरोनाविरुद्धचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण लढत आहोत. त्या लढाईतही आपण जिंकू, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, भारतात विकासाचे चक्र पुन्हा गती घेईल. आपण सगळे मिळून आर्थिक संकटही परतवून लावू. देश संकटात असताना आम्ही सगळे एक आहोत ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …