नवी मुंबई : बातमीदार
महापे मिलेनियम पार्कमधील एका आयटी कंपनीत काम करणार्या 40 पैकी 19 कर्मचार्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, तर उर्वरित कर्मचार्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. महापे येथील एका डेटाबेस कंपनीतील 40 कर्मचार्यांचे रूटीन चेकअप करण्यात आले होते. त्यामध्ये 19 कामगारांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सर्व कोरोनाग्रस्तांचे स्वॅब सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेत, तर नवी मुंबई महापालिकेने त्यांना वाशी येथील पालिका रुग्णालयात आयसोलेट करीत त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री चेक केली.