Breaking News

श्रीवर्धनमध्ये 24 एप्रिल ते 3 मेपर्यंत पूर्णत: लॉकडाऊन; व्हॉट्सअ‍ॅपद्वारे घरपोच मिळणार सेवा

श्रीवर्धन : प्रतिनिधी

तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले असून सात हजारांपेक्षा जास्त नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. दुसरीकडे शेकडो चाकरमानी परतले आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन शहरातील बाजारपेठ 24 एप्रिल ते 3 मेपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला असून यातून मेडिकल सुविधा वगळण्यात आली आहे.

या काळात ग्राहकांना अत्यावश्यक साहित्य घरपोच दिले जाणार आहे. त्यासाठी यादी बनवून व्यापारी बांधवांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवावी लागणार आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply