हिंगोली : प्रतिनिधी : पबजी गेमच्या वेडापायी हिंगोलीत दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. नागेश गोरे (वय 22) आणि स्वप्नील अन्नपुर्णे (वय 24) अशी मृत तरुणांची नावे आहेत. नागेश आणि स्वप्नील हिंगोली येथील खटकाळी बायपास भागात रेल्वे रुळावर बसून पबजी गेम खेळण्यात दंग असताना दोघांना रेल्वेने चिरडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
नागेश आणि स्वप्नील हे दोन्ही मित्र असून, सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळाजवळ मोटरसायकल उभी करून रेल्वे रुळावर पबजी गेम खेळत बसले होते. याच वेळी अचानक समोर आलेल्या अजमेर-हैदराबाद रेल्वेच्या धडकेने दोघे रेल्वेखाली चिरडले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. हे दोघे मित्र हनुमान नगर येथील रहिवासी आहे. त्यांचा मृ्त्यू झाल्याने हिंगोली परिसरात शोककळा पसरली आहे.