Breaking News

रहदारीस अडथळा असलेला खड्डा विक्रांत पाटील यांनी बुजवला

पनवेल : वार्ताहर

राष्ट्रीय महामार्गाहून पनवेल शहरात येणार्‍या गार्डन हॉटेलजवळील रस्त्यावर खड्डा पडल्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत होती.

महामार्ग आणि त्यात सिग्नल असल्याने शहरात येणार्‍या आणि शहराबाहेर पडणार्‍या वाहनांना वळण घेण्यास अडथळा येत होता. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढत होते.

याबाबतची तक्रार महापालिका अधिकार्‍यांना पत्राद्वारे देण्यात आली होती, पण बरेच दिवस या विषयावर कोणतीच कारवाही होत नसल्याने कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगून काँक्रीट मागवून घेतले व स्वतः जातीने उभे राहून खड्डा बुजवून घेतला.

आपल्या प्रभागातील समस्यांचे निरसन नगरससेवक विक्रांत पाटील त्वरित करून घेतात याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply