Breaking News

अॅड. प्रकाश आंबेडकरांकडून महामानवाच्या विचारांना गालबोट

नगर : प्रतिनिधी : जातीच्या अंतासाठी लढणार्‍या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करताना उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे़ या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी (दि. 17) येथे केली.

या वेळी बोलताना प्रा. कवाडे म्हणाले की, अ‍ॅड. आंबेडकर हे आजपर्यंत जाती अंताविषयी बोलत होते़. शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावरील जातीचा उल्लेख काढून टाकावा, अशी त्यांची मागणी होती. प्रत्यक्षात मात्र त्यांनीच त्यांच्या उमेदवारांच्यासमोर जातीचा उल्लेख केला आहे. आता आंबेडकर यांच्या जाती अंताच्या लढ्याला काय अर्थ आहे? असाही सवाल प्रा. कवाडे यांनी उपस्थित केला.

लोकसभा निवडणुकीत पिपल्स रिपब्लिकन पक्षाने महाआघाडीकडे महाराष्ट्रातील चार जागांची मागणी केली आहे. यामध्ये शिर्डी, अमरावती, रामटेक व इचलकरंजी यांचा समावेश आहे. आम्हाला किमान दोन जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीत पक्षाने आदेश दिला; तर आपण स्वतः निवडणूक लढविणार आहोत. महाआघाडीत येण्याचे वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण दिले होते, त्यांनी मात्र त्याला प्रतिसाद दिला नाही, असे प्रा. कवाडे यांनी सांगितले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply