Breaking News

आरआयए लसीकरण केंद्राचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनाही द्यावा

भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांची मागणी

धाटाव : प्रतिनिधी

येथील एमआयडीसीमधील रोहा इंडस्ट्रीयल असोसिएशन (आरआयए) सभागृहात कामगारांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. तेथे पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप युवामोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी केली आहे.

रोहे शहरात लस घेण्यासाठी होणारी गर्दी पाहता आरआयए सभागृहात लसीकरण केंद्र व्हावे, अशा मागणीचे निवेदन भाजपने 10 एप्रिल रोजी प्रशासनाकडे दिले होते. त्याची दखल घेऊन धाटाव एमआयडीसीमधील आरआयए सभागृहात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र तेथे केवळ कामगारांचेच लसीकरण करण्यात येत आहे.

धाटाव एमआयडीसीमध्ये परजिल्हा, परराज्यातून मालवाहतूक करणार्‍या गाड्या तसेच अधिकारी व कामगार येत असतात. यामुळे आजूबाजूच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मलखंडवाडी येथील 22 कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्याचा संसर्ग होऊन अनिल घाग या युवकाचा मृत्यू झाला होता.

धाटाव एमआयडीसी परिसरातील नागरिकांना लस देणे ही आरआयएची नैतिक जबाबदारी आहे. आरआयए सभागृह केंद्रात कामगारांसह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचेदेखील लसीकरण करण्यात यावे, असे अमित घाग यांनी निवेदनात म्हटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply