माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त
नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणार्या इन्फिनिटी अॅक्टींग आणि मीडिया अकॅडमीच्या वतीने तीन महिन्यांचे शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात यशस्वी झालेल्या प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव सोहळा तसेच एकपात्री, द्विपात्री व नाटीका सादरीकरण पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी (दि. 18) आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या कार्यक्रमास भाजप सांस्कृतिक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक उमेश घळसाशी, सहसंयोजक संचित यादव, कोकण विभाग सहसंयोजक अक्षय चितळे, श्यामनाथ पुंडे स्मिता गांधी, पल्लवी यादव, अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
पनवेल परिसरात नाट्यकला रूजावी आणि मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी दीपक पवार यांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य हे महत्त्वाचे असून अशा व्यक्तिमत्वामुळे पनवेलचे नाव मोठे होत आहे, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या वेळी केले तसेच इन्फिनिटी अॅक्टींग आणि मीडिया अकॅडमीच्या यशस्वी प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
या वेळी करणसिंग राजपूत, मयूर ठाकूर, सुनील भारतीय, समर सावंत, युवराज देशमाने, सुरज शिंदे, युक्ता सुर्यवंशी, ऋतूजा पोटे, अस्मिता बोधावडे, अनया पिंगळे, ओबी मोघे, समर्थ वाडेकर, प्रेम पाटील, साहिल मांडे, अमित बोधावडे या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.