Breaking News

कळंबोलीतील ज्येष्ठ नागरिक संघाकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन

कळंबोली ः रामप्रहर वृत्त  
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशा वेळी गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल 60 हजार कुटुंबांना गणेशोत्सव गोड करण्यासाठी अन्नधान्य दिले जात आहे. याबद्दल त्यांचे कळंबोली ज्येष्ठ नागरिक संघाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.  
कोरोनाच्या संकटात गोरगरीब तसेच हातावर पोट असणार्‍या नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व भारतीय जनता पक्ष कळंबोलीच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून लाखो नागरिकांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर 90 हजारांहून अधिक नागरिकांना तांदूळ, गोडेतेल, तूरडाळ, कांदे-बटाटे, साखर आदी अन्नधान्य देऊन आधार देण्यात आला.
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी आमदार प्रशांत ठाकूर, पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व सहकारी कोविड रुग्णालयांशी समन्वय साधून रुग्णांच्या उपचाराकडे जातीने लक्ष देत आहेत. लॉकडाऊनपासून विविध प्रकारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व भारतीय जनता पक्ष कळंबोली यांच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची सेवा करून सर्वतोपरी मदत सुरू आहे. गणेशोत्सवात ग्रामीण व शहरातील 60 हजार कुटुंबांना धान्याचे एकत्रित पॅकेट्स देऊन त्यांचा सण गोड करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिकांचाही विचार करण्यात आला. त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे ज्येष्ठ नागरिक संघ कळंबोलीच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे, असे ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव पी. सी. हातेकर यांनी सांगितले.

Check Also

भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही

आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …

Leave a Reply