Breaking News

भारताच्या इरफानला ऑलिम्पिकचे तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळच्या मलप्पुरम गावातील इरफान कोलोथूम थोडी या 29 वर्षीय खेळाडूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट जिंकले आहे. जपान येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतील चालण्याच्या शर्यतीच्या इरफानने 1 तास 20.57 सेकंदाची वेळ नोंदवताना ऑलिम्पिक आणि 2019मध्ये होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता निश्चित केली. विशेष म्हणजे इरफानला या स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत इरफान याने 1:20.57 सेकंदाची वेळ नोंदवताना ऑलिम्पिक प्रवेश पक्का केला. 27 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर येथे होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही तो आता सहभागी होणार आहे. इरफानसह आशियाई स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून देविंदर आणि गणपती या भारतीय खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता निश्चित केली. देविंदरने 1 तास 21.22 सेकंदाची; तर गणपतीने 1 तास 22.12 सेकंदाची वेळ नोंदवली. इरफानने 2012च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. गतवर्षी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान ‘नो निडल पॉलिसी’चे उल्लंघन केल्यामुळे त्याला स्पर्धेतून माघारी पाठवण्यात आले होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply