Breaking News

‘एक धाव इंडियन आर्मी’साठी! सैनिकांच्या सन्मानार्थ 1100हून अधिक महिलांचा मॅरेथॉनमध्ये सहभाग

नवी मुंबई : बातमीदार

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टुरिझम स्टडिज् यांच्या संयुक्त विद्यमाने होत ‘एक धाव इंडियन आर्मी’साठी घोषवाक्य नजरेसमोर ठेवत महिलांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या 5 किमी मीटर अंतराच्या मॅरेथॉनमध्ये 1100हून अधिक महिलांनी सहभागी होत भारतीय सैनिकांविषयीचा आदरभाव प्रकट केला. या मॅरेथॉनला नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाचे उपायुक्त अमोल यादव, तुर्भे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किसन गायकवाड यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला. विशेष म्हणजे मॅरेथॉनमध्ये प्राप्त झालेला निधी पुलवामातील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून देण्यात आला. या स्पर्धेत कोमल खांडेकर, अश्विनी मोरे, कांचन हलगारे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. याशिवाय उत्तेजनार्थ 12 पारितोषिके उपायुक्त अमोल यादव, तुर्भे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किसन गायकवाड, सहाय्यक आयुक्त  प्रकाश वाघमारे, तसेच स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टुरिझम स्टडिज् या विभागाच्या प्रमुख वंदना मिश्रा चतुर्वेदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.स्पर्धेत नवी मुंबई महापालिका शाळा क्र. 55, छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थिनींनी  विशेष प्राविण्य दाखवत दुसरा व तिसरा क्रमांक, तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे प्राप्त केली.

Check Also

राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात -आमदार प्रशांत ठाकूर

मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात जवळपास अडीच लाख क्षयरोग रुग्ण आहेत. त्यांच्या उपचारासाठी लागणार्‍या …

Leave a Reply