Breaking News

कामोठ्यात स्मशानभूमीच्या दुरुस्तीला सुरुवात

नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या पाठपुराव्याला यश

कामोठे : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘क’ येथील प्रभाग क्र. 13 मधील जुई-कामोठे येथील अस्तित्वात असलेल्या कराडी स्मशानभूमीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली असून या कामाचा प्रारंभ नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी त्यांनीच मागणी व पाठपुरावा केला होता.

कामोठे नोडमधील जुई गावातील खाडी बंदराच्या परिसरातील स्मशानभूमीची संपुर्णपणे दुरावस्था झालेली होती. त्यामुळे या स्मशानभुमीमध्ये नागरिकांना बसण्याकरीता बेंचेसची व्यवस्था करणे, पत्रे नव्याने टाकणे, झाडे झुडपे साफ करणे, पाण्याची योगय रित्या सोय करणे, तसेच पडण्याच्या अवस्थेत असलेल्या खोलीचेही पक्के बांधकाम करण्यात यावे, अशा मागणीचे पत्र नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी पनवेल पालिका आयुक्तांना दिले होते. या मागणीची दखल घेत पनवेल पालिकेकडून निविदा काढून कार्यादेश काढण्यात आला. त्यानुसार या दुरुस्ती कामाला प्रारंभ करण्यात आला.

या वेळी नगरसेवक विकास घरत, शिला भगत, हेमलता गोवारी, भाऊ भगत, रवी गोवारी, धनाजी पाटील, अरुण गोवारी, आदित्य भगत, तुळशीराम पाटील, अमर म्हात्रे, शशी भोपी, मनोहर भोपी, रोहन भोपी, रोशन भोपी, उमेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply