Breaking News

कर्जतच्या अकादमीचे कराटेत सुयश; 18 स्पर्धकांनी जिंकली 42 पदके

कर्जत : बातमीदार

ठाणे येथील कराटे प्रशिक्षक व प्राचीन संरक्षण कलेचे अभ्यासक नासीर मुलानी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कराटे टूर्नामेंटमध्ये कर्जतच्या मुला-मुलींनी विशेष प्रविण्य मिळवत एकूण 42 पदकांची कमाइ केली आहे.  कर्जत येथील मेत्ता बुडोकॉन कराटे अकादमीचे प्रशिक्षक सुरज पंडित यांच्या मार्गदर्शनखाली अकादमीच्या 18 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. मार्शल आर्ट, बुडोकॉन, तायक्वॉन्डो, शोतोकॉन, कुंफू शावलीन आदी कराटे प्रकारांमध्ये ही स्पर्धा भरविली गेली होती. या स्पर्धेसाठी राज्यभरातून हजारो स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. ठाणे शहरातील कोळीवाडा सभागृहात झालेल्या या स्पर्धेत कर्जतमधील मुला-मुलींनी तब्बल 42 पदकांची कमाई करीत नेत्रदीपक यश संपादित केले आहे. या यशाबद्दल विजेत्या स्पर्धकांचे व प्रशिक्षक पंडित यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. – पदकप्राप्त खेळाडू यश गुप्ता, युवराज ठाकूर, अमन इड्रोस प्रत्येकी 2 सुवर्ण, 2 ग्रँड चॅम्पियनशीप ट्रॉफी, राजेश लष्करे 2 सुवर्ण 1 ग्रँड चॅम्पियनशीप ट्रॉफी, कार्तिकी पोपळे 1 सुवर्ण, 1 कांस्य, 1 ग्रँड चॅम्पियनशीप ट्रॉफी, साक्षी गुप्ता 2 सुवर्ण, शिव बडे 1 सुवर्ण 1 रौप्य, प्रशिक रोकडे 1 सुवर्ण, 2 कांस्य, शुभदा गोंधळी, स्वराज गोंधळी, साहिल पाटील प्रत्येकी 1 सुवर्ण 1 कांस्य, करण तांबोळी व दानेश इद्रोस प्रत्येकी 1 सुवर्ण, कृष्णा गुप्ता, नमन भासे 2 रौप्य, संस्कृती बडे, सानिका पोपळे 1 रौप्य, प्रेम गायकवाड 2 कांस्य.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply