Breaking News

किराणा दुकानदारांकडून ग्राहकांची लूट

जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री

कर्जत : बातमीदार
कोरोनामुळे लॉकडाऊन काळात बहुतांश किराणा दुकानदार, व्यापारी हे मालाच्या कमतरतेचे कारण सांगत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढवून ग्राहकांना लुटत असल्याचा प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. रोजच्या स्वयंपाक करताना लागणार्‍या गरजेच्या वस्तू, कडधान्य, डाळी, मसाले, तेल असे चढ्या दराने विक्री केली जात आहे.
सर्वसामान्य ग्राहकाच्या जीवावर आपला व्यवसाय करून संपत्ती कमावलेले दुकानदार, व्यापारी कोरोनाच्या संकटसमयी मात्र याच ग्राहकांची लूट करतानाचे चित्र आहे. सरकारच्या सूचना, निर्देशांना धाब्यावर बसवून चढ्या किमतीने मालाची विक्री केली जात आहे. ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी राज्य शासनाने तसेच प्रशासकीय यंत्रणेने धडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मटण-चिकनचे भावही वधारले
किराणा सामानाबरोबरच भाजीपाला, फळांचे दरही वाढले आहेत. उन्हाळ्यात ताज्या भाज्या, फळे शरिरासाठी आवश्यक असतात, पण त्यांचे दर वाढले आहेत. मटण, चिकन विक्रेत्यांची तर चांदीच होऊ लागली आहे. मटणाचे दर प्रतिकिलो 650 ते 700 रुपयांच्या घरात गेले आहेत. मटण परवडत नसल्याने अनेकांनी चिकनकडे आपला मोर्चा वळविला आहे, मात्र चिकनही 200 रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे सर्वसामान्याला मात्र काय खावे, असा प्रश्न पडला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply