Breaking News

पनवेलमध्ये तीन नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात तीन नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, त्यातील दोघे मुंबईला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. महापालिका क्षेत्रात दोन आणि ग्रामीण भागात एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 58 रुग्ण झाले
असून, तालुक्यातील रुग्णांची संख्या 68 झाली आहे, तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 81वर पोहोचला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल सेक्टर 6 मधील आर्मी रिटायर्ड व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या व्यक्तीला नवीन पनवेलच्या पॅनेसिया हॉस्पिटलमध्ये  उपचार घेण्यासाठी गेल्याने तेथून संक्रमण झाले असावे, असा अंदाज आहे. कळंबोली येथील एलआयजी. कॉलनीतील 39 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. ही व्यक्ती मुंबई महापालिकेत सफाई कामगार असून, तिला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत  पनवेल महापालिका हद्दीतील 724 जणांची टेस्ट केली गेली. त्यापैकी 22 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी 32  जणांवर उपचार सुरू असून  24 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत
दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये मंगळवारी एक नवीन रुग्ण आढळला. ही महिला उलवे नोड सेक्टर 10 बी येथे राहणारी असून, ती मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. ग्रामीण भागात 10 पैकी पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून आणखी दोघांना उद्यापर्यंत घरी सोडण्याची शक्यता आहे.
पनवेल शहर आणि ग्रामीण भागातून शेकडो व्यक्ती मुंबईला जात आहेत. ग्रामीणमधील एकट्या सुकापूरमधून अत्यावश्यक सेवेसाठी रोज 200 कर्मचारी मुंबईला जात असल्याचा सर्व्हेचा अहवाल आहे. या अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. त्यावर राज्य शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply