Breaking News

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांकडून सुटीचा सदुपयोग

पेण ः प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याने अनेकांना घराबाहेर जाता येत नाही. या फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी व शहरातील पगारदार वर्ग तसेच गृहिणी विविध कामांत व्यस्त असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात आला. फक्त अत्यावश्यक सेवांनाच या कालावधीत सूट दिल्याने बहुतांश सर्व व्यवहार हे जवळजवळ ठप्पच झाले आहेत. अशा वेळी फावल्या वेळेत करायचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला असतानाच शेतकरी व अन्य नागरिकांनी शेतीच्या कामाला प्रथम प्राधान्य देऊन आपल्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग कसा करायचा याबाबत नियोजन करून कामाची आखणी केली आहे. तसेच महिलावर्गही तांदूळ, पोहे व उडदाचे पापड करणे, तांदूळ, साबुदाण्याच्या फेण्या, तांदळाच्या शेवया, कडधान्ये सुकविणे आदी कामात, तर शेतकरी व अन्य नोकरदारवर्ग शेतीची बांधबंदिस्ती, घरांचे बांधकाम व दुरुस्ती तसेच जंगल भागातून सरपण गोळा करणे आदी कामांत व्यस्त आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply