Breaking News

कळंबोलीतही मोदी भोजन कम्युनिटी किचन उपक्रम

कळंबोली : प्रतिनिधी
कोरोना आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन व संचारबंदीच्या परिस्थितीत गरीब, गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपच्या वतीने कळंबोलीत मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून मोफत जेवण दिले जात आहे. अशाच प्रकारे पनवेल, कामोठे, खारघर, तक्का, येथे अन्नछत्र सुरू करण्यात आलेले आहे.
कळंबोली सेक्टर 14, मार्बल मार्केट, सिंग सिटी हॉस्पिटल झोपडपट्टी आणि कळंबोली लोखंड-पोलाद बाजार अशा चार महत्त्वाच्या ठिकाणी मोदी भोजन कम्युनिटी किचन सुरू करण्यात आली आहेत. अन्न फाईल व कंटेनरमध्ये बंद करून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वाटप केले जात आहे. यासाठी नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, भाजप शहराध्यक्ष रविशेठ पाटील, कमल कोठारी, प्रशांत ननावर आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply