Breaking News

अभिनेता इरफान खानची चटका लावणारी एक्झिट

मुंबई : प्रतिनिधी
आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी (दि. 29) निधन झाले. गेली अनेक वर्षे कॅन्सरशी झुंजणार्‍या 53 वर्षीय इरफानने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफान खानने दमदार भूमिका साकारल्या होत्या. जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने त्याने 50हून अधिक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले. हॉलीवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्याला गौरविण्यात आले होते.
दोन दिवसांपूर्वी इरफानची आई सईदा बेगम यांचे निधन झाले. लॉकडाऊनमुळे आईला शेवटचे पाहता आले नाही. आईचे अंत्यदर्शनही व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावे लागले. याचे दुःख त्याच्या मनात होते. ही घटना ताजी असतानाच खुद्द इरफानच सर्वांना सोडून गेला. त्याच्या निधनाच्या बातमीनंतर विविध क्षेत्रांतील दिग्दजांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply