Breaking News

श्रावणात गोंडा फुले महागली

उरण : वार्ताहर

श्रावण महिना सुरु झाला अन पूजेला लागणारी गोेंडा (झेंडू) फुले महागली असल्याचे चित्र उरण बाजार पेठेत पहावयास मिळाले.

लॉकडाऊनमुळे दादर, वाशी येथून येणारी फुले कमी प्रमाणत येऊ लागल्याने त्याच बाजारपेठेत हि फुलांचे भाव वाढल्याने 120 रुपये एक किलो दराने विकत मिळणारी गोेंडा (झेंडू) फुलांचा भाव वाढला असून 200 रुपये किलो दराने विक्रीस होती. एका किलोस 80 रुपये जास्त मोजावे लागत होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये त्या करिता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. बाहेरून येणारी फुले महाग मिळत आहेत त्यामुळे फुलांच्या किमतीत वाढ आली आहे, असे फुल विक्रेत्याने सांगितले. तसेच पूजेसाठी मिळणारी फुले ही कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने मुंबई, इतर ठिकाणांहून कमी येतात. त्यामुळे फुलांना मागणी जास्त असते. एकतर फुलांना मागणी वाढली तरीही पूजे साठी आम्हाला  लागणारी फुलांना जास्त पैसे द्यावे लागत आहेत, असे फुले खरेदी करणार्‍या संतोष पाटील नामक ग्राहकाने सांगितले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply