Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

63वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पनवेल आणि कामोठे येथे मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोका विजयादशमी दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. या ऐतिहासिक घटनेला मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी 63 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पनवेल आणि कामोठे येथे 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने पनवेल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळेस पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रकाश बिनेदार, कल्पेश कांबळे, सुनील वाघपंजे, अनिल जाधव, विजय गायकवाड, नरेंद्र गायकवाड, तसेच कामोठे येथे आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदिश गायकवाड, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, गौतम कांबळे, आर. जी. म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply