पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उसर्लीगाव येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मोरया गार्डन रेसिडन्सी, 2 एच-102, गावदेवी मंदिराच्या बाजूला, उसर्लीगाव, ता.पनवेल व त्यापासून पूर्वेस/सदिच्छा को.ऑ.हौ.सो.पश्चिमेस प्रयाग गार्डन/गंगा विहार को.ऑ.हौ.सो., उत्तरेस विचुंबेकडे जाणारा रस्ता व दक्षिणेस एनपी निसर्ग सोसायटी हा परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंन्टेंमेन्ट झोन (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे.
तालुक्यातील विचुंबे येथे एक व्यक्ती कोरोनाविषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या ओंकार पार्क, बिल्डींग नं.03, विंग ए, रुम नंबर 203, विचुंबे, ता.पनवेल व त्यापासूनच्या पूर्वेस एकदंत को.ऑ.हौ.सो.,पश्चिमेस श्रीकृष्ण रिव्हर व्हॅली, उत्तरेस सेंट थॉमस स्कूल व दक्षिणेस तबेला हा परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंन्टेंमेन्ट झोन (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे.
तसेच तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या रुम नं.705, रिध्दी-सिध्दी एक्झो बिल्डींग, प्लॉट क्र.बी 11, सेक्टर-8, उलवे ता.पनवेल व त्यापासूनचा पूर्वेस प्लॉट नं.10, पश्चिमेस 24 मीटर रस्ता व प्लॉट नं.13, 14, दक्षिणेस प्लॉट नं.12 व 25, उत्तरेस प्लॉट नं.1, 1 बी हा परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंन्टेंमेन्ट झोन (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.