Breaking News

माथेरान-अमन लॉज शटल सेवा आजपासून

कर्जत : बातमीदार

मिनिट्रेनची माथेरान ते अमन लॉज शटल बुधवार (दि. 4)पासून धावणार आहे. कोरोनामुळे माथेरान ठप्प झाल्यानंतर काही दिवसांत मिनिट्रेनसुद्धा बंद करण्यात आली. तेव्हापासून शटल सेवाही बंद होती. अनलॉक अंतर्गत 2 सप्टेंबरला माथेरान सुरू झाल्यानंतर पर्यटक येऊ लागले, पण अमन लॉज ते माथेरान हे दोन किलोमीटरचे अंतर चालताना पर्यटकांची दमछाक होते. त्यामुळे पर्यटकांनी आपली व्यथा स्थानिक प्रशासनाला सांगितली व मिनिट्रेन सुरू करण्याबाबत आग्रह धरला. त्यानुसार तब्बल आठ महिन्यांनंतर शटल सेवा पर्यटकांसाठी बुधवारपासून उपलब्ध होणार आहे. दरम्यान, तीन द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी आणि दोन मालवाहू बोगीसह शटल पर्यटकांच्या सेवेसाठी धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

मिनिट्रेनचे वेळापत्रक

माथेरान ते अमन लॉज : सकाळी 9:30 व सायं. 4 वा. अमन लॉज ते माथेरान : सकाळी 9:55 व सायं. 4:25 वा.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply