Breaking News

वैद्यकीय दाखल्यासाठी स्थलांतरितांची झुंबड

उरणमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

उरण : प्रतिनिधी
राज्य शासनाने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वैद्यकीय दाखला बंधनकारक केला आहे. हा आरोग्यविषय दाखला घेण्यासाठी उरण येथे कामानिमित्त आलेल्या परप्रांतियांनी शहरातील रुग्णांलयासमोर उभे राहत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्ली केली. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उरण शहर आणि तालुक्यात मुंबईच्या यलोगेट पोलीस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीसह त्याची पत्नी व मुलगी असेे तीन कोरोनाबाधित वगळता अन्य ठिकाणी सध्या कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव झालेला नाही, परंतु एखाद्या बाधित इसमाने प्रवेश केल्यास उरणला कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे शहरातील गर्दी कमी होऊन सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे असताना काही लोक बिनधास्तपणे गर्दी करीत आहेत. अशातच कामानिमित्त आलेल्या परप्रांतियांनी उरण शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयासह पालवी हॉस्पिटलसह इतर ठिकाणच्या रुग्णालयांसमोर सोशल डिस्टन्सिंग न पाळता रांगा लागल्याचे दिसून आले. त्यातून कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply