Breaking News

परप्रांतीयांना वैद्यकीय प्रमाणपत्र, फॉर्मचे वाटप

माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांचे सहकार्य

कळंबोली : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना संसर्ग होऊ नये याकरिता रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे आपल्या गावाकडे जाणारे परप्रांतीय विशेषत: उत्तर भारतीय अडकून पडले होते. असा लोकांना 38 दिवसानंतर जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा 400 परप्रांतीयांना गावाकडे जाण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी शासकीय कागदपत्रांची पुर्तता करून मदत केली. मुंबई , महाराष्ट्रातील वाढते कोरोना रुग्ण त्यात हाताला काम नसल्याने गरीब गरजू कामगार संपूर्ण खचून गेला होता, त्यामुळे गावाला जाण्याशिवाय तो दुसरा कोणताच विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हता. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय विशेषत: उत्तर भारतीयांना आपल्या प्रांतात जाण्यासाठी विशेष गाडी सोडण्यात येईल, या आशेपोटी गेल्या दीड महिन्यापासून उत्तर भारतीय तग धरून होते. लॉकडाऊन-2 वाढल्यानंतर तर परप्रांतीयांचा संयम सुटला व अनेक परप्रांतीयांचे जथेच्या जथ्थे पायी गावाकडे निघाले होते. शेवटी सरकारला अडकलेल्या कामगारांना त्यांच्या गावाला सोडल्याशिवाय पर्याय नाही, त्याप्रमाणे केंद्र सरकारकडून रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा 400 परप्रांतीयांना माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्याकडून फॉर्मचे वाटप करण्यात येवून वैद्यकीय प्रमाणपत्र व शासकीय कामातही  मदत करण्यात आली. खांदा कॉलनीतून परप्रांतीयांना घेवून दोन बसेस पनवेल रेल्वे स्थानकाकडे रवाना करण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंग पाळत व सॅनिटाइझ होऊन गाड्या सोडण्यात आल्या.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply