

उरण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण शहरात गुरुवारी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. परप्रांतीय फिटनेस प्रमाणपत्रासाठी इतरत्र फिरताना दिसत होते. भाजीवाले, किराणा व इतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. फक्त जीवनावश्यक म्हणजे मेडिकल दुकाने सुरु होती. उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण चार फाटा, राजपाल नाका, पालवी हॉस्पिटल, वैष्णवी हॉटेल, एन. आय. हायस्कूल आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.