Breaking News

मोहोपाडा वीज वितरणकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामांना गती

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी परिसरातील मोहोपाडा विजवितरण कार्यालयाकडून पावसाळ्याची खबरदारी म्हणून वीज वाहिन्यांना अडथळा ठरणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम विज वितरणाकडून सुरू आहे.

पावसाळ्यात वीज वाहिन्यांच्या संपर्कात झाडांच्या फांद्या आल्याने मोठ्या अपघाताची शक्यता असते. यासाठी महाराष्ट्र विजवितरण कंपनीकडून दरवर्षी पावसाळ्याअगोदर रस्त्याशेजारी, गावांतील विजवाहिन्यांना अडथला निर्माण करणार्‍या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. यावर्षी तलेगाव, कांबा, रिस, चांभार्ली, रिसवाडी, भोकरपाडा, पोयंजे, खानावले, ठोंबरेवाडी आदी भागात वीज वितरणाकडून पावसाळ्यापुर्वीची कामे सुरू असून काही वेळेपुरता त्या त्या परीसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.

या साठी मोहोपाडा विज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता किशोर पाटील, प्रधान तंत्रज्ञ बालासाहेब किर्दंकुडे, वायरमन जितू डुकरे, हरिबा विनायक शिंदे, वाजेकर, जगताप, चौधरी, मांडे, भोसले आदी उपस्थित राहून पावसाळ्यापूर्वीची कामे करुन घेत आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply