Breaking News

श्रमिक रेल्वेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

रोहे : प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटकाळात विविध व्यवसाय व कारखान्यातील परप्रांतीय मजुरांना काम नसल्याने त्यांना घरी जाण्याची ओढ लागली आहे, परंतु त्यांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी कोणतीही वाहने उपलब्ध नसल्याने मजुरांची गैरसोय होत होती. त्या अनुषंगाने  या मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे व शासनाच्या वतीने विशेष श्रमिक रेल्वे गाडी सुरू करण्यात आली आहे. गोवा राज्यातूनही ग्वाल्हेर येथे जाण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात आली आहे. गोवा राज्यातील परप्रांतीय  मजुरांना घेऊन श्रमिक प्रवासी रेल्वे ग्वाल्हेर येथे रवाना झाली असता मध्य रेल्वेच्या रोहा स्थानकात सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आल्यानंतर या गाडीत कोणी चढू व उतरू नये यासाठी प्रशासन सतर्क झाल्याने रोहा रेल्वेस्थानकात सायंकाळच्या सुमारास चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, रेल्वे पोलीस निरीक्षक विधाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्यासह रेल्वे व रोहा पोलिसांचा रेल्वेस्थानकात सायंकाळी 5 वाजल्यापासून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वेस्थानकात आल्यानंतर अवघ्या सात मिनिटांत ही गाडी ग्वाल्हेरकडे रवाना झाली. गाडी गेल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त हलविण्यात आला. या वेळी रोहा व रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना दिल्या.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply