पनवेल ः प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षातील ढोंगी पुढार्यांच्या मतलबी कारभाराला कंटाळून पनवेल तालुक्यातील मोरबे ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 27) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
शेकाप नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेकापचे चिंध्रण पंचायत समिती युवाध्यक्ष प्रमोद भगत यांच्यासह गणपत पाटील, देहू पाटील, सुभाष पाटील, धर्मा पाटील, संजय पाटील, विजय पाटील, श्रीपद पाटील, दीपक पाटील, सागर पाटील, काळूराम पाटील, सचिन पाटील, जगदिश पाटील, रितेश भगत, नंदन पाटील, अविनाश भगत, सोमनाथ भगत, मनुकांत पाटील, लता पाटील, अनिता पाटील, अश्विनी पाटील, सुरेखा पाटील, बारकीबाई पाटील, सपना पाटील, प्रेमाबाई पाटील, माईबाई पाटील, मीराबाई पाटील, मैनाबाई भगत, प्रियांका भगत, आरती भगत, नम्रता पाटील आदी कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप पनवेल तालुका युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजित पाटील, माजी सरपंच नारायण भगत, माजी सदस्य एकनाथ नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
नवीन पनवेल येथे भीम जयंती महोत्सव; गायक आनंद शिंदे यांचा बहारदार कार्यक्रम
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीचे …
RamPrahar – The Panvel Daily Paper