Breaking News

श्री विरुपाक्ष मंदिराचा वर्धापनदिन

पनवेल ः पनवेल शहरातील श्री विरुपाक्ष महादेेव मंदिराचा वर्धापनदिन शासनाच्या नियमाप्रमाणे झाला. सालाबादप्रमाणे यंदाही श्री विरुपाक्ष महादेव मंदिराचा वर्धापन दिन कार्यक्रम कोरोना संक्रमण झाल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे या वर्षी शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे झाला. त्यामुळे सर्व भक्तांनी घरूनच दर्शन घेतले.

गॅलेक्सी कंपनीच्या माध्यमातून पनवेलकरांना बहुमोल सहकार्य

पनवेल : वार्ताहर

तळोजा औद्योगिक वसाहतीतील गॅलेक्सी कंपनीमध्ये उच्च पदावर असलेले परशुराम पोवार यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात पनवेल परिसरातील नागरिकांसाठी विविध मार्गाने साधन सामुग्री औषधे व इतर मदत देत एक वेगळा ठसा उमटविला आहे. पनवेल येथे राहणारे व गॅलेक्सी कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असणारे परशुराम पोवार यांनी आतापर्यंत कंपनीच्या माध्यमातून सामाजिक बांधलकी म्हणून पनवेल महानगरपालिकेसाठी कोरोना मदत म्हणून कंपनी कडुन 1500 पीपीई किट, 405 लीटर सॅनिटायझर, 250 किलो हॅण्ड वॉश, 2000 किलो सोडीयम हायप्रोक्लोेराईंड, 500 फेस मास्क दिले आहेत. तसेच तळोजा पोलीस ठाण्यात 150 लिटर सॅनिटायझर, 100 जीवनावश्यक वस्तूंची पॅकेट, 400 फेस मास्क, कामोठे पोलीस ठाण्यासाठी 120 लिटर सॅनिटायझर, खांदेश्वर पोलीस ठाण्यासाठी 125 लिटर सॅनिटायझर, पोलीस उपायुक्त कार्यालयासाठी 340 लिटर सॅनिटायझर, 700 जीवनावश्यक वस्तूंचे किट, त्यामध्ये सर्व महत्वाच्या वस्तू दिल्या आहेत. तसेच अशाप्रकारे ग्रामीण भागातील गरजवंतांना त्यांनी अन्नधान्याचे वाटप केले आहे.

संशयित रुग्णांचा विलगीकरण कक्षात ठिय्या

पनवेल : बातमीदार

पनवेल येथील इंडियाबुल्स विलगीकरण कक्षात 22 दिवसांपासून असणार्‍या नवी मुंबईतील कोरोना संशयित रुग्णांचा संताप शनिवारी उफाळून आला. या कक्षातील संशयित रुग्णांनी थेट महापालिकेच्या अधिकार्‍यांनाच घेराव घालून जाब विचारला. या बाबत रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी यांच्यात गैरसमजातून वाद झाले होते. तीन चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय घरी सोडता येत नसल्याने उशीर होत आहे, असे नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

पोलिसांशी हुज्जत घालणार्‍यावर कारवाई

पनवेल : वाहतूक पोलिसांशी नाहक हुज्जत घालणार्‍या एका व्यक्तीविरोधात तालुक्यातील गव्हाण फाटा परिसरात कारवाई करण्यात आली आहे. गव्हाण फाटा येथे बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्याने अनुपसिंग (32) याच्याविरूद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करीत त्याची गाडीसुद्धा जप्त केली आहे.

सुरक्षारक्षकास मारहाण

पनवेल : सुरक्षारक्षकाचे काम करणार्‍या एका व्यक्तीस अनोळखी लोकांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील जावळा गाव परिसरात घडली आहे. या परिसरात सुरक्षारक्षकाचे काम कऱणार्‍या दिलीप जगताप यांना अनोळखी लोकांनी मारहाण केल्याने याबाबतची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली असून या अनोळखी व्यक्तींचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत.

कोप्रोली परिसर कंटेन्मेंट झोन घोषित

पनवेल : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील ग्रीन हेवन गृहनिर्माण संस्था ई विंग ही इमारत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply