पनवेल ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि प्रवीण स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रामधील विद्यार्थी मित्रांसाठी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत लक्ष्मण भोईर आणि नृत्य स्पर्धेत कार्तिकी गवारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांना रविवारी (दि. 9) स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या संपर्क कार्यालयात बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी भारतीय जनता पक्ष आणि प्रवीण स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये माझा आवडता नेता किंवा कोरोना योद्धा यांचे चित्र काढून पाठवायचे होते. नृत्य स्पर्धेसाठी देशभक्तीपर अथवा लोकसंगीतावर आधारित नृत्याचा व्हिडीओ पाठवायचा होता. या स्पर्धेला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाल्याने आयोजकांना बक्षिसांची संख्या वाढवावी लागली.
या स्पर्धेचा निकाल रविवारी जाहीर करून विजेत्यांना पनवेल महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, नगरसेवक रामजी बेहरा, युवा मंडळ अध्यक्ष विनोद घरत, व्यापारी सेल अध्यक्ष अंबालाल पटेल, युवा उपाध्यक्ष शुभ पाटील, अनिल साबने, ठाणे-पालघर युवा मोर्चा सचिव संजय पवार आणि प्राजक्ता मालुसरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
चित्रकला स्पर्धा ः 1. लक्ष्मण भोईर, 2. जास्मिन राजगुरू, 3. तनिशा भोईर, 4. आनंद भोईर, 5. श्रेया पॉल नृत्य स्पर्धा ः 1. कार्तिकी गवारी, 2. तनुश्री साबणे, 3. प्रार्थना पटेल, 4. आर्या सोनटक्के, 5. आस्मी गायकवाड.
RamPrahar – The Panvel Daily Paper