Breaking News

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; विसरलेला ऐवज मालकाला केला परत

माणगाव ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहरातून दररोज हजारो नागरिक आपले कुटुंब घेऊन मिळेल त्या वाहनाने व पायी प्रवास करून आपले गाव जवळ करीत आहेत. अशाच प्रकारे मूळचे म्हसळा येथील खरसई गावचे मेंदटकर कुटुंबीय नालासोपार्‍यातून गावी येताना इंदापूर येथील रिक्षाचालक सचिन बाबरे यांनी या कुटुंबाला मदत करून आपल्या रिक्षातून मूळ गावी सोडले. या प्रवासात मेंदटकर कुटुंबीयांची पैशांची व दागिन्यांची बॅग अनावधानाने रिक्षात राहिली. घरी गेल्यानंतर शोधाशोध झाली, मात्र 70 हजार रुपये आणि तीन लाखांचे दागिने असलेली बॅग सापडली नाही. दरम्यान, सचिन बाबरे  घरी आल्यानंतर रिक्षाची साफसफाई करताना त्यांना ही बॅग दिसली. त्यांनी तातडीने बॅगमालकाचा शोध घेऊन मेंदटकर कुटुंबीयांना ती बॅग परत केली. कष्टाने कमावलेला ऐवज परत मिळाल्याने मेंदटकर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करीत सचिन बाबरे यांचे आभार मानून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. सचिन बाबरे यांच्या प्रामाणिकपणाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांना मातृशोक

गंगादेवी बालदी यांचे निधन उरण ः रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री …

Leave a Reply