Breaking News

विंधणे येथे मरूआई गावदेवीची यात्रा उत्साहात

उरण : बातमीदार  : उरण तालुक्यातील विंधणे गावातील मरूआई गावदेवीच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (दि. 2) रोजी श्री सत्यनारायण महापूजा, शुक्रवारी (दि. 3) रोजी मरूआई यात्रा, असे नियोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी 12 वाजता गावदेवी यात्रा काठी उभारणी, दुपारी 3 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री गावदेवी मरूआई विश्वस्त मंडळ विंधणे, व्यवस्थापक समिती विंधणे, ग्रामस्थ मंडळ विंधणे आदींनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. यात्रेसाठी पनवेल, उरण, नवी मुंबई, अलिबाग, कल्याण, ठाणे, चिरनेर येथून भक्तगण दर्शनासाठी आले होते. उद्योजक प्रसाद पाटील, उरण पंचायत समिती सदस्या दिश प्रसाद पाटील, विंधणे ग्रुप ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी पाटील, सामाजिक कार्यकर्ते यशवंत म्हात्रे ग्रामस्थ व मान्यवर आदींनी श्री गावदेवी मरूआई देवीचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त बच्चेकंपनीसाठी पाळणे, विविध प्रकारचे खेळ, महिलांसाठी विविध सौंदर्य प्रसाधने, खेळणी यांची दुकाने थाटण्यात आली होती. यात्रेनिमित्ताने पाहुणे मंडळींनी उपस्थित लावली होती.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply