Breaking News

मोकाट जनावरांसाठी सामाजिक संस्था, प्राणीमित्रांचा पुढाकार

पनवेल ः वार्ताहर

कोरोनाच्या संकटकाळात शहरासह ग्रामीण भागात आता अन्नपाण्याासाठी मोकाट जनावरे रस्त्यावर येऊ लागली आहेत. काही ठिकाणी पांजरपोळ आहेत, तर बळीराजाने आपली जनावरे मोकाट सोडल्याने त्यांच्या अन्नपाण्याची जबाबदारी अनेक सामाजिक संस्था तसेच प्राणीमित्र आणि पशुप्रेमी घेताना दिसत आहेत. सध्याच्या लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात जनावरांच्या वैरणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पनवेल तालुक्यात आता थोड्याफार प्रमाणात बळीराजाकडे पाळीव जनावरे आहेत, परंतु शेतीला हातभार लावणार्‍या या जनावरांना सध्याच्या रखरखत्या उन्हात सांभाळणे त्यांना मोठ्या जोखमीचे झाले आहे. त्यांच्या मदतीला आता विविध सामाजिक संस्था, पशुप्रेमी, प्राणीप्रेमी तसेच पांजरपोळ चालविणार्‍या संस्था पुढे आल्या असून ते आपापल्या परीने मोकाट जनावरांसह या पाळीव जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निकाली काढत आहेत. भाजी मार्केट, फळ मार्केट आदी ठिकाणी उरणार्‍या विविध भाज्या व फळे आता मोकाट जनावरांना खायला देण्यात येत आहेत. काही जण आपल्या घासातील घास काढून त्या जनावरांना देत आहेत, तर कित्येकांनी त्यांच्यासाठी रस्त्यावर छोटे मोठे पाणवठे उभे करून ठेवले आहेत. तसेच चिमण्या, कावळे, कबुतरे, पोपट, मोर, भटकी कुत्री, रस्त्यावर फिरणारी माकडे आदींसाठीही या संघटनांमार्फत खाण्यापिण्यासाठी विविध उपाययोजना होताना दिसत आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply