Breaking News

आजीबाईंच्या पित्ताशयातून निघाले 1110 खडे

पनवेल : रामप्रहर वृत्त

गेल्याच महिन्यात खारघर येथील महिलेच्या पित्ताशयातून 550 खडे काढण्याची घटना ताजी असताना अलिबाग येथे राहणार्‍या 94 वर्षीय

महिलेच्या पित्ताशयात 1110 खडे मिळाल्याची दुर्मीळ घटना नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे घडली आहे.

  या केसमध्ये या  आजींवर लॅप्रोस्कॉपिक शल्यचिकित्सा करून त्यांचे पित्ताशय काढून टाकण्यात आले. थळ (अलिबाग) येथे राहणार्‍या राधाबाई नाईक (94) यांना पोटदुखीचा त्रास गेली तीन महिन्यांपासून सुरू होता. त्यांच्या वयाचा विचार करता स्थानिक डॉक्टर त्यांना हेवी डोस देऊ शकत नव्हते. वयाची  90 वर्षे पूर्ण झाल्यामुळे पित्ताशय काढण्याची  शल्यचिकित्सा कठीण असल्याची माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे लॅप्रोस्कॉपिक शल्यचिकित्सक डॉ. नितीन तवटे  यांनी दिली.  या स्थितीला वैद्यकीय भाषेत अक्युट कॅल्क्युलस कोलेसिस्टिसीस असे म्हणतात. दहा पैकी तीन रुग्णांमध्ये  ही समस्या दिसून येते. सर्वसाधारणपणे रुग्णांच्या पित्ताशयात 10 ते 20 खडे दिसून येतात. अत्यंत दुर्मीळ प्रकरणात 500 खडे असल्याचे आढळून आले आहे, परंतु या केसमध्ये 1110 खडे आढळून आले आहेत व ही महाराष्ट्रातील दुर्मीळ अशी वैद्यकीय घटना आहे.  जवळपास तीन तास या

महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांच्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply