Breaking News

कर्जतमधील कुपोषिक बालकांच्या संख्येत घट

कर्जत ः बातमीदार

कर्जत आदिवासीबहुल तालुका असून दुर्गम भागातील हा तालुका येथील कुपोषणाने नेहमीच चर्चेत असतो. मार्च महिन्यात या तालुक्यात सॅम आणि मॅम श्रेणीमधील 169 कुपोषित बालके होती, तर एप्रिल महिन्यात त्यात नऊने घट झाली असून कर्जत तालुक्यात 160 कुपोषित बालके आहेत. कर्जत तालुक्यात आतापर्यंत अनेक बालकांचा कुपोषणाने बळी गेला आहे. आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्याकडून कर्जत तालुक्यात 160 कुपोषित बालके आहेत, असे जाहीर करण्यात आले आहे, तर मार्च अखेरपर्यंत कर्जत तालुक्यात ही आकडेवारी 169 इतकी होती. कर्जत तालुक्यात सॅम श्रेणीत दोन्ही प्रकल्पांत मिळून 29 बालकांचा समावेश आहे, तर मॅम श्रेणीत 140 अशा एकूण कुपोषित बालकांची संख्या 169 इतकी होती. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य समिती सभापती सुधाकर घारे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ही माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. सी. के. मोरे यांनी दिली होती. कर्जत पंचायत समितीचे आरोग्य विभागप्रमुख डॉ. सी. के. मोरे आणि एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी निशिगंधा भवाळ यांनी प्रसिद्ध केलेली कुपोषणाची यादी ही 160 म्हणजेच मागील महिन्याच्या तुलनेत नऊने कमी झाली आहे. त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात कर्जत तालुक्यातील दोन्ही प्रकल्पांत मिळून सॅम श्रेणीत 21, तर मॅम श्रेणीत 139 बालके आहेत. त्यांची एकूण संख्या 160 इतकी आहे.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply