आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन 13 व 14 ऑगस्ट रोजी नवीन पनवेल येथील सिडको समाजमंदिरात करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते 13 ऑगस्टला सकाळी 10 वाजता होणार आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्य्क्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. उद्घाटन समारंभास लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, सेक्रेटरी नंदकिशोर धोत्रे़, खजिनदार एस. जी. चव्हाण. स्पोर्ट्स प्रोजेक्ट चेअरमन राजेंद्र जेसवानी, संजय पोतदार, नागेश देशमाने, अशोक गिल्डा, मधुकर भगत, मदन गोवारी, संजय गोडसे, गौतम म्हस्के, माजी लायन अध्यक्ष मीना पोतदार, ज्योती देशमाने, भावना जेसवानी, शोभा गिल्डा अरवख उपस्थित राहणार आहेत. स्पर्धा बिगिनर्स, 11 वर्षांखालील, 13 वर्षांखालील, 15 वर्षांखालील, 17 वर्षांखालील, 19 वर्षांखालील मुली व मुले, महिला व पुरुष, व्हेटरन पुरुष, प्ाुरुष डबल्स अशा विविध गटांत घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे चीफ रेफ्र्री म्हणून डी. आर. साळसकर व असिस्टंट चीफ रेफ्री पराग अंकोलेकर काम पाहणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष हेमंत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. कै. मोरेश्वर सदाशिव पोतदार व कै. मंगला मोरेश्वर पोतदार यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे टेबल टेनिस स्पर्धेतील पुरुष व महिला विजेत्यास फिरता चषक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी संघ निवडताना या स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा विचार केला जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper