पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील उप जिल्हा रुग्णालयातील (कोविड- 19) च्या अत्यावश्यक सेवेत काम वैद्यकिय विभागात काम करणार्या कंत्राटी कर्मचार्यांना कामावर कायम करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन दिले आहे.
नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सध्या देशभर सर्वत्र पसरलेल्या कोरोना या वाढत्या महामारीवर मात करण्याकरीता पनवेल उप जिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय विभागातील कर्मचारी पूरेपर कष्ट घेत आहोत, अत्यावश्यक सेवेत आपल्या जीवाची पर्वा न करता नागरीकांच्या सेवेकरीता रात्रंदिवस कष्ट घेऊन कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेमध्ये वैद्यकिय कंत्राटी कर्मचारी आहोरात्र मेहनत करीत आहेत. त्यांना या अत्यावश्यक सेवे मध्ये कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकिय कर्मचार्यांना (कोविड-19) च्या अनुषंगाने पनवेलमधील उप जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचार्यांना कामावर कायम करण्यात यावे. या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन पनवेलमधील उप जिल्हा रुग्णालयातील (कोविड-19) च्या अत्यावश्यक सेवेत काम करणार्या वैद्यकिय विभागातील कंत्राटी कर्मचार्यांना कामावर कायम करण्यात यावेत, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.